वडगाव सुक्रे येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वडगाव सुक्रे : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त तसेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त वडगाव सुक्रे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने श्री क्षेत्र नृसिंह पोखरणी ते वडगाव अशी ‘क्रांतीज्योत’ मोठ्या उत्साहात आणण्यात आली. संत सावता महाराज तरुण मित्र मंडळ, मायभूमी फाउंडेशन आणि गावकरी मंडळींच्या उपस्थितीत ज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महापुरुषांच्या विचारांचा जयघोष करत नृसिंह पोखरणी येथील ग्रामस्थ व तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यानंतर गावातील वैकुंठभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचे आयोजनही उत्साहात पार पडले. सायंकाळी ‘क्रांतीबाची क्रांती’ हे एकपात्री नाटक शितलताई गोरे यांनी सादर केले. त्यानंतर झालेल्या व्याख्यानमालेत प्रा. ज्ञानेश्वर घुगे (संघर्ष करिअर अकॅडमी) यांनी शिव-शाहू-फुले विचार मांडले. तसेच लहुजी सेनेचे शिवाजी शेळके व बालाजी बिडगर यांनीही महापुरुषांच्या विचारांचा जागर केला.
या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. संकल्प फाउंडेशन (नृसिंह पोखरणी) यांना विशेष सामाजिक पुरस्कार देण्यात आला. पत्रकार निखिल सुके, ऋषीकेश पांचाळ व सतीश सुके यांना गौरविण्यात आले. सेवा पुरस्कार डिगांबर शिंदे यांना, तर आदर्श शिक्षक पुरस्कार सतीश जांभळे, तुकाराम सुके व यादव साहेब यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास पोलीस पाटील सुभाषराव सुके, माजी सरपंच परमेश्वर सुके, सरपंच अश्विनी भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.संत शिरोमणी सावता महाराज तरुण मित्र मंडळ, वडगाव व मायभूमी फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित हा जयंती उत्सव विविध समाजाभिमुख उपक्रमांमुळे उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





