वाघोली पोलीसांची मोठी कारवाई : एम.डी. ड्रग्ज विक्री करणारे दोन आरोपी अटक, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद प्रतिनिधी :
पुणे शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत वाघोली पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत एम.डी. ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून, एकूण ३१ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७, सहायक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दि. ५ एप्रिल २०२६ रोजी पोलीस पथक सातव वस्ती रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना आशियाना लॉजजवळ एका संशयित इसमाला कारसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्याची ओळख योगेश सुभाष कणगरे (वय ३८) अशी पटली. त्याच्या अंगझडतीत ५ ग्रॅम ४ मि.ग्रॅ. एम.डी. पावडर (किंमत १.०८ लाख रुपये) आणि ३ लाख रुपयांची चारचाकी गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान कणगरे याने ही ड्रग्ज त्याचा साथीदार सोनू सिंह उर्फ मनुवेंद्र उर्फ सोनू शंकर सिंह (वय ४२) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत ८ ग्रॅम ७ मि.ग्रॅ. एम.डी. पावडर (किंमत १.७४ लाख रुपये), ५० हजारांची अॅक्टिव्हा, तसेच १० हजारांचा मोबाईल जप्त करण्यात आला. यानंतर पुढील तपासात आरोपीच्या घर व वाहन झडतीत २३ ग्रॅम २ मि.ग्रॅ. एम.डी. पावडर (किंमत ४.६४ लाख रुपये) आणि २० लाख रुपयांची कार जप्त करण्यात आली.
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण३७ ग्रॅम ३ मि.ग्रॅ. एम.डी. पावडर, दोन कार, एक दुचाकी आणि एक मोबाईल,असा एकूण ३१ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त सोमनाथ मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





