नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सुवर्णा डफळ यांचा कॉम्प्युटर सायन्स प्रशिक्षणात द्वितीय क्रमांक – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

सुवर्णा डफळ यांचा कॉम्प्युटर सायन्स प्रशिक्षणात द्वितीय क्रमांक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद प्रतिनिधी :

जिल्हा परिषद शाळा, लोणीकंद येथील शिक्षिका सुवर्णा संतोष डफळ यांनी कॉम्प्युटर सायन्स प्रशिक्षणात पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल आयोजित गौरव सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी संजय नाईक, उपशिक्षणाधिकारी आस्मा मोमीन व वाघमारे यांच्या हस्ते पार पडला.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पुणे यांच्या माध्यमातून ऍमेझॉन व लीडरशिप फॉर इकती यांच्या संयुक्त विद्यमाने “कॉम्प्युटर सायन्स टिचिंग एक्सलन्स” हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत शिक्षकांसाठी स्क्रॅच कोडींगमधील लिस्ट, व्हेरिएबल, ऑपरेटर, कंडिशनल अशा संकल्पनांवर आधारित ४५ दिवसांचा ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला होता..

या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील एकूण १०७६ शिक्षकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७६ शिक्षकांनी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. कोर्समध्ये उत्कृष्ट प्राविण्य मिळवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान डिजिटल साहित्य व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

या उपक्रमात लोणीकंद जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुवर्णा संतोष डफळ यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.सुवर्णा डफळ यांना हवेली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्ताराधिकारी शंकर मुंढे, केंद्रप्रमुख शांता इचके तसेच मुख्याध्यापक एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, पंचायत समिती सदस्या मोनिका कंद, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक व शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930