नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊर येथे २ मे रोजी ‘समाधान शिबिर’ : नागरिकांचे प्रलंबित प्रश्न होणार मार्गी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

थेऊर येथे २ मे रोजी ‘समाधान शिबिर’ : नागरिकांचे प्रलंबित प्रश्न होणार मार्गी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

हवेली तालुक्यातील थेऊर येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत’ शनिवार, दिनांक २ मे रोजी ‘समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार असून, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रलंबित प्रश्न यावेळी निकाली काढले जाणार आहेत.

सभापती युवराज काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत नागरिकांना थेट सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. थेऊरफाटा-थेऊर रोडवरील आशिर्वाद बॅन्क्वेट हॉल येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, थेऊर, कोलवडी, साष्टे, कुंजीरवाडी आणि मांजरी बुद्रुक या गावांचा त्यामध्ये समावेश आहे.

या शिबिरात महसूल, पोलीस, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, पाटबंधारे आणि महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना घरकुल योजना, रेशनिंग धान्य, जातीचा दाखला, उत्पन्न व रहिवासी दाखले, तसेच ग्रामपंचायत घरपट्टी व पाणीपट्टीसंदर्भातील सेवा दिल्या जाणार आहेत.

तसेच तुकडेबंदी नियमितीकरण, वर्ग-२ ते वर्ग-१ जमीन प्रकरणे, भूसंपादन, अकृषिक प्रकरणे, ७/१२ मधील दुरुस्त्या, फेरफार प्रकरणे, ई-मोजणी आदी कामांबाबतही मार्गदर्शन व तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे. याशिवाय पीएम किसान, नमो किसान, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे.

शिबिराच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी (३० एप्रिल) ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात आली असून, अधिकारी नागरिकांकडून अर्ज स्वीकारत आहेत. त्यामुळे २ मे रोजी लाभांचे तात्काळ वाटप करणे सुलभ होणार आहे.

अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी कामकाजासाठी विविध पथके नियुक्त केली असून, कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930