नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर कंद यांची बिनविरोध निवड – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर कंद यांची बिनविरोध निवड

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद (ता. हवेली) : लोणीकंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर बबन कंद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच डॉ. सोनाली जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या पदासाठी सागर कंद यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जालिंदर बोरावणे यांनी जाहीर केले.

नवनिर्वाचित उपसरपंच सागर कंद यांच्या निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, उपसभापती रवींद्र कंद, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद, पंचायत समिती सदस्य मोनिका कंद, सरपंच सुप्रिया कंद, माजी चेअरमन जनार्दन वाळुंज यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच सागर कंद यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता, पथदिवे तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित विकासकामांना प्राधान्य देऊन गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या निवडीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031