नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शिक्रापूरात नदीकाठी सोडलेले नवजात बालक; पोलिस व पत्रकाराच्या सतर्कतेने मिळाले नवजीवन – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

शिक्रापूरात नदीकाठी सोडलेले नवजात बालक; पोलिस व पत्रकाराच्या सतर्कतेने मिळाले नवजीवन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शिक्रापूर, प्रतिनिधी : संदीप ढाकुलकर

शिक्रापूर येथील वेळ नदीच्या काठावर अज्ञात व्यक्तीने सोडून दिलेले नवजात बालक शिक्रापूर पोलिस व स्थानिक पत्रकार यांच्या तत्परतेमुळे सुखरूप वाचले असून त्याला नवजीवन मिळाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असताना पोलिसांच्या संवेदनशीलतेचेही कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील वेळ नदीकाठी सुरेशराव करंजे हे पूजेसाठी गेले असता त्यांना नदीच्या कडेला एक बेवारस नवजात बालक आढळून आले. याबाबतची माहिती सचिन करंजे यांनी पत्रकार व सर्पमित्र शेरखान शेख यांना दिली. त्यानंतर शेख यांनी तात्काळ शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना माहिती दिली. मिनाक्षी करंजे यांच्या मदतीने बालकाला त्वरित शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस हवालदार उद्धव भालेराव, आत्माराम तळोले, महिला पोलीस हवालदार उज्वला गायकवाड तसेच किरण निकम यांनी रुग्णालयात धाव घेतली.ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम, डॉ. पराग कानडे, डॉ. मान्या मिश्रा तसेच प्रिया जाधव-ढगे, वैभवी शेळके, सारिका वाळकोळी, मांडवी मिंदाणे, कांचन गुल्हाणे, आरोग्य सेविका कल्पना ढोकले व सोनल मोरे यांनी बालकावर तातडीने उपचार करून त्याची प्रकृती स्थिर केली.

यानंतर शिक्रापूर पोलिसांनी बालकल्याण समितीच्या माध्यमातून बालकाला पुणे येथील संस्थेत दाखल केले. या प्रकरणी घटनास्थळी पाहणी करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.नवजात बालकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर या घटनेची माहिती समजताच रुग्णालयातील कर्मचारी व उपस्थित पोलीस अधिकारी भावूक झाले. बालकाची प्रकृती सुधारत असल्याचे पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले.

खाकीतील माणुसकीचे दर्शन बालकाला पुण्यातील संस्थेत दाखल करण्यासाठी नेताना शिक्रापूर पोलिसांनी वाहन सजवून त्यातून बालकाची व्यवस्था केली. तसेच नव्या कपड्यांसह आवश्यक वस्तूंचीही सोय करण्यात आली. या कृतीतून पोलिसांच्या संवेदनशील व मानवतावादी भूमिकेचे दर्शन घडले.

बालक पूर्णपणे सुदृढ पत्रकार व सर्पमित्र शेरखान शेख यांनी सकाळी रुग्णालयात आणलेल्या या नवजात बालकाची तपासणी केल्यानंतर तो पुरुष जातीचा असून पूर्णपणे सुदृढ असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम यांनी सांगितले. बालकाला पुढील संगोपनासाठी पुण्यातील संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930