नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २.०३ कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २.०३ कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतूक व साठ्याविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल २ कोटी ३ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १,७१६ बॉक्स अवैध मद्यसाठ्यासह दोन सहाचाकी कंटेनर वाहने जप्त करण्यात आली आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विभागाच्या पथकाने प्रथम शिक्रापूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथे छापा टाकून गोवा व कर्नाटक राज्य विक्री परवानाधारक मद्याचा मोठा साठा जप्त केला.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पथकाने धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्ग परिसरात एक कंटेनर ताब्यात घेतला. या कंटेनरमध्ये बिअर व मद्याचे ६९६ बॉक्स आढळून आले. त्यामध्ये सुमारे ८१ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यानंतर पुढील तपासात सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ आणखी एक कंटेनर पकडण्यात आला. या वाहनात विविध राज्यांसाठी विक्रीस परवानाधारक असलेल्या मद्याचे १,०१६ बॉक्स आढळले. तपासात संबंधित वाहनांवर बनावट क्रमांक प्लेटचा वापर करण्यात आल्याचेही उघड झाले. या कारवाईत १ कोटी २१ लाख ९९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २ कोटी ३ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा अवैध मद्यसाठा व वाहने जप्त करण्यात आली आहेत. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930