नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तुळापूर येथील रेव्ह पार्टी प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी; संभाजी ब्रिगेडचे लोणीकंद पोलिसांना निवेदन – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

तुळापूर येथील रेव्ह पार्टी प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी; संभाजी ब्रिगेडचे लोणीकंद पोलिसांना निवेदन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र समाधीस्थळामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या तुळापूर येथे नुकत्याच उघडकीस आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बंगला मालक, आयोजक आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोणीकंद पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या तुळापूर परिसरातील एका बंगल्यात “प्रोजेक्ट X” या नावाने रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे १०० तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून अमली पदार्थांचे सेवन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या कारवाईबद्दल संभाजी ब्रिगेडने पुणे पोलिसांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत. मात्र, समाधीस्थळाच्या पवित्र परिसरात अशा प्रकारच्या मद्य व अमली पदार्थांच्या पार्टी होणे अत्यंत निंदनीय असून यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात म्हटले आहे.

संभाजी ब्रिगेडने प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये बंगला मालक, पार्टी आयोजक आणि संबंधित सहभागी व्यक्तींवर एनडीपीएस कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, तुळापूर परिसराला “नो पार्टी झोन” किंवा “पवित्र क्षेत्र” म्हणून घोषित करावे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या दोन किलोमीटर परिसरात दारू, अमली पदार्थ व अन्य अनैतिक कृत्यांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा सचिव निलेश ढगे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सोनू शेलार यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930