नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ट्रेलरची विद्युत खांबांना धडक; परिसराचा वीजपुरवठा खंडित – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

ट्रेलरची विद्युत खांबांना धडक; परिसराचा वीजपुरवठा खंडित

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी : लोणीकंद येथील केसनंद रोडवरील राजेश सोसायटीसमोर सोमवारी (दि. ८) पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रेलरने विद्युत वाहिनीच्या डबल पोल स्ट्रक्चरला धडक दिल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, (MH 14 KA 2129) क्रमांकाचा ट्रेलर उताराच्या रस्त्यावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रेलर थेट विद्युत वाहिनीच्या खांबांवर जाऊन आदळला. या धडकेत डबल पोल स्ट्रक्चर, विद्युत खांब तसेच परिसरातील काही वस्तूंचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित भागातील वीजपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी व लाईनमन घटनास्थळी दाखल झाले. नुकसानग्रस्त विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती लाईनमन यांनी दिली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरातील नागरिकांना वीजपुरवठा खंडित होण्याचा फटका बसला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930