नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , भावडीत अवैध उत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

भावडीत अवैध उत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी :

हवेली तालुक्यातील मौजे भावडी येथील खानपट्टा परिसरातील गट क्रमांक २३१ मध्ये गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर अप्पर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केल्याचे आढळून आले. महसूल विभागाच्या पथकाने एक हायवा डंपर जप्त केला असून तो पुढील कार्यवाहीसाठी लोणीकंद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. जप्त वाहनामध्ये सुमारे दोन ब्रास गौण खनिज आढळून आले.

कारवाईची माहिती मिळताच उत्खननासाठी वापरण्यात येणारे पोकलेन मशीन घटनास्थळावरून पसार झाले. महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, संबंधित ठिकाणी तब्बल ४२२ ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी नियमानुसार ४२२ ब्रास उत्खननावर आकारण्यात येणारा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे. निर्धारित मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्यात येईल, अशी माहिती मंडळ अधिकारी संदीप झिंगाडे यांनी दिली.

ही कारवाई मंडळ अधिकारी संदीप झिंगाडे, ग्राम महसूल अधिकारी माधव बिराजदार, जोशी, संजय गारकर यांच्या पथकाने संयुक्तरित्या केली. महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930