नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , जागतिक योग दिनानिमित्त वढू खुर्दच्या डोंगरावर योगाभ्यास – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

जागतिक योग दिनानिमित्त वढू खुर्दच्या डोंगरावर योगाभ्यास

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वढू खुर्द : जागतिक योग दिनानिमित्त वढू खुर्द येथे ग्रामस्थ, आपली माणसं आनंदी माणसे समूह तसेच कोरेगाव भीमा येथील तरुण मित्र परिवार यांच्या उपस्थितीत वढू खुर्द गावालगतच्या उंच डोंगरावर योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात सुमारे ७० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमात योगासने, पद्मासन, सूर्यनमस्कार आदी विविध व्यायामप्रकारांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. नियमित व्यायाम आणि योगाचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व याविषयी सर्जेराव पवळे, सुरेश चोंधे, नवनाथ पवळे, राघूतात्या तापकीर, संपत बढे, शिरीष देशमुख, विलास खांदवे आणि रमेश भंडलकर यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी वढू गावचे सरपंच महेंद्र खांदवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वॉकिंग ग्रुपमधील सुमारे २० सदस्य गेल्या १५ वर्षांपासून दररोज सकाळी ८ ते १० किलोमीटर चालण्यासह नियमित एक तास व्यायाम करत आहेत. या समूहाने आतापर्यंत सुमारे १५ गड-किल्ल्यांवर यशस्वी मोहिमा केल्या आहेत.

विशेष म्हणजे, या समूहातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ सदस्यांनीही कळसुबाई शिखर, राजगड आणि रायगड यांसारखे दुर्गम किल्ले सर केले आहेत. हे यश नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930