नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , वाढदिवसानिमित्त गुणगौरव सोहळा; उपस्थितांचे उत्तम भोंडवे यांनी मानले आभार – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

वाढदिवसानिमित्त गुणगौरव सोहळा; उपस्थितांचे उत्तम भोंडवे यांनी मानले आभार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद : प्रबोधन केंद्र व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या वर्धापनदिनानिमित्त तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्तम विठ्ठल भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सोहळ्यास नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात पारंपरिक वाढदिवस साजरा करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले. केक कापणे किंवा फ्लेक्सबाजी टाळून २५ गुणवंत विद्यार्थ्यांचा टी-शर्ट, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर उपस्थितांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना उत्तम भोंडवे म्हणाले की, “समाजाचे आपल्यावर मोठे उपकार असतात. आपणही समाजाचे काही देणे लागतो आणि ते सामाजिक कार्यातून फेडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न राहता समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी ठरावी.”

आपल्या जन्मतारखेबाबत बोलताना त्यांनी पूर्वी शालेय दाखल्यांतील जन्मतारखांमध्ये अनेकदा तफावत असायची, त्यामुळे स्वतःच्या जन्मवर्षाबाबत काही संभ्रम राहिला असला तरी समाजोपयोगी कार्यासाठी वाढदिवस हे केवळ एक निमित्त असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते, लोणीकंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, नातेवाईक, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे माजी व विद्यमान विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पावसामुळे अनेकांना उपस्थित राहता आले नाही. त्यांनी दूरध्वनीद्वारे व संदेशातून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत उत्तम भोंडवे यांनी भविष्यातही समाजोपयोगी उपक्रमांसाठी असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031