नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हरिनामाच्या गजरात प्रस्थान – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हरिनामाच्या गजरात प्रस्थान

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

महापुराच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त; मंदिर प्रदक्षिणेनंतर गांधी वाड्यात पहिला मुक्काम

आळंदी : श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी (दि. ८) सायंकाळी आळंदी येथून हरिनामाच्या अखंड गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. गळ्यात तुळशीमाळ, हातात भगव्या पताका आणि मुखी विठ्ठलनाम घेत लाखो वारकरी भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी झाले. यंदा इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची उपाययोजना केली होती.

माऊलींच्या चलपादुकांची विधिवत पूजा, आरती आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पालखीने मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर आळंदीतील ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेत “माऊली-माऊली”च्या जयघोषात सोहळ्याला प्रारंभ केला. पालखीचा पहिला मुक्काम आळंदीतील गांधी वाडा येथील दर्शनबारी सभागृहात झाला.

प्रस्थान सोहळ्याला धर्मादाय सहआयुक्त दिनेश कोथळीकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार महेश लांडगे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, पुरुषोत्तम महाराज पाटील, चैतन्य महाराज लोंढे, राजेंद्र आरफळकर यांच्यासह विविध मानकरी, विश्वस्त, अधिकारी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदा आळंदी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि इंद्रायणी नदीच्या महापुरामुळे शहरातील अनेक पूल बाधित झाले. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने मंदिर परिसरात प्रवेशावर निर्बंध घातले आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. यामुळे अनेक वारकरी आणि भाविकांना प्रत्यक्ष प्रस्थान सोहळा पाहता आला नाही. काही ठिकाणी पोलिसांशी किरकोळ वादावादीही झाली.

दरम्यान, आळंदी देवस्थानने सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून दिल्याने लाखो भाविकांना घरबसल्या प्रस्थान सोहळ्याचा आनंद घेता आला. गुरुवारी (दि. ९) सकाळी पालखी आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. प्रस्थानापूर्वी पहाटे काकड आरती, पवमान अभिषेक, महानैवेद्य, समाधीपूजन, मंदिर स्वच्छता आणि आकर्षक पुष्पसजावट असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.संततधार पावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम राहिला आणि संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930