नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , संतदास उपाख्य ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार जाहीर – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

संतदास उपाख्य ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

आळंदी (गौतम पाटोळे) : संस्कृत, हिंदी आणि मराठी साहित्याच्या त्रिवेणी संगमातून संत साहित्याची समृद्ध परंपरा जपणारे संतदास उपाख्य ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना ‘राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. केएसआय पब्लिकेशन, कोल्हापूर यांच्या वतीने हा पुरस्कार येत्या २३ ऑगस्ट २०२६ रोजी आळंदी येथे प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात केएसआय पब्लिकेशनचे अध्यक्ष साहित्यिक विलास पाटील इंगळीकर यांच्यासह साहित्यिक व मान्यवरांच्या हस्ते हिंगणकर महाराज यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून फोन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर हे कीर्तनकार, प्रवचनकार तसेच साहित्यिक म्हणून परिचित आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी शिक्षण घेतले. त्यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, ऋषिकेश व हरिद्वार येथे संस्कृत भाषेतील पाणिनी व्याकरणशास्त्राचा त्यांनी सखोल अभ्यास केला.

वारकरी संप्रदायाची परंपरा जपत त्यांनी अनेक अभंग, गवळणी, संस्कृत सुभाषिते तसेच सामाजिक जाणिवेवर आधारित साहित्याची निर्मिती केली आहे. ‘वासुदेव पासष्टी’, ‘अभंग निर्झर भाग १’ आणि ‘अभंग निर्झर भाग २’ ही त्यांची ग्रंथसंपदा असून, ‘सुभाषित मकरंद’ हा त्यांचा संस्कृत ग्रंथ २३ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. सोशल मीडियावरही त्यांचे अनेक अभंग, गवळणी व संस्कृत सुभाषिते प्रसिद्ध आहेत.

आपल्या साहित्य व कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून हिंगणकर महाराज यांनी संत साहित्य, वारकरी परंपरा आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन व्यापक समाजापर्यंत पोहोचविले आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, माऊली घुंडरे आदींनी हिंगणकर महाराज यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930