नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , आळंदीत लक्ष्मीनारायण यागानिमित्त ब्रह्मध्वज पूजन उत्साहात – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

आळंदीत लक्ष्मीनारायण यागानिमित्त ब्रह्मध्वज पूजन उत्साहात

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

आळंदी :श्री क्षेत्र आळंदी ब्रह्मवृंद अनुष्ठान मंडळाच्या वतीने माऊलींची पालखी दशमीला परतल्यानंतर एकादशीपासून तीन दिवसीय श्री लक्ष्मीनारायण यागाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त ब्रह्मध्वज पूजनाने यागाला उत्साहात प्रारंभ झाला.

मंडळाच्या यंदाच्या ४३ व्या वर्षानिमित्त आयोजित या यागाचे आयोजन योगीराज मंगल कार्यालय येथे करण्यात आले. वे. मू. निखिल प्रसादे गुरुजी व वे. मू. चैतन्य जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञविधी पार पडला.

यागाच्या पहिल्या दिवशी यज्ञारंभानंतर सायंकाळी ह. भ. प. चिदंबरेश्वर साखरे महाराज यांचे प्रवचन झाले. तसेच सौ. विदुला व डॉ. सारंग (अप्पा) जोशी यांच्या भक्तीपूर्ण गायनाने वातावरण भक्तिमय झाले.दुसऱ्या दिवशी सकाळी हवन, दुपारी वेदसेवा व सायंकाळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वे. मू. प्रकाशशास्त्री दंडगे गुरुजी, वे. मू. विवेक विश्वनाथशास्त्री जोशी तसेच ज्येष्ठ नागरिक शैलाताई व दत्तात्रय हरिभाऊ कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोकशास्त्री कुलकर्णी गुरुजी होते, तर वे. मू. अनंतशास्त्री मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विश्वस्त बाळासाहेब पोफळे, यजमान प्रशांत मुळे, अरविंद जोशी व संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विविध सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन चितळे गुरुजी व श्रावणी जोशी यांनी केले.

तिसऱ्या दिवशी यज्ञाची पूर्णाहुती झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमास आळंदीतील वेदपाठशाळेतील विद्यार्थी व गुरुजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त चैतन्यमहाराज लोंढे (कबीरबुवा) व पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या शुभेच्छा यज्ञासाठी लाभल्या. समीर व श्रीरंग सुनील तुर्की यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

मंडळाचे अध्यक्ष वे. मू. चितळे गुरुजी, कार्याध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर जोशी, कोषाध्यक्ष बाळासाहेब पोफळे, विश्वस्त विजय कुलकर्णी, मुरलीधर प्रसादे, चैतन्य जोशी तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने तीन दिवसीय लक्ष्मीनारायण याग उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930