नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , आळंदी माऊली मंदिरात परंपरा जपत नागपंचमी साजरी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

आळंदी माऊली मंदिरात परंपरा जपत नागपंचमी साजरी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

नागदेवतेची सनई-चौघड्याच्या गजरात सवाद्य मिरवणूक; महिला भाविकांची मोठी गर्दी

आळंदी (गौतम पाटोळे) : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी नगरीत श्रावणातील नागपंचमीचा सण प्रथा-परंपरांचे जतन करीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विशेषतः महिला भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

नागपंचमीच्या निमित्ताने आळंदीतील मानकरी कुटुंबातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने नागदेवतेची पूजा करून सण साजरा केला. आळंदी नगरपरिषद चौकातील नागदेवतेची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सनई-चौघड्याच्या मंगलमय वादनात नागदेवतेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

ही मिरवणूक आळंदी नगरपरिषद चौकातून श्री लक्ष्मीनारायण विष्णू मंदिर मार्गे आवेकर भावे रामचंद्र संस्थानच्या श्री राम मंदिराकडे नेण्यात आली. श्री राम मंदिरात मिरवणुकीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी श्री नागदेवतेची पूजा करण्यात आली. मानकरी महिलांचा नारळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.

श्री राम मंदिरात ॲड. अनुष्का आवेकर यांच्या हस्ते श्रींची पूजा तसेच नारळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री राम मंदिराचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, पुजारी महेश आयचित, ईश्वरी आयचित, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कुऱ्हाडे पाटील, विठ्ठल घुंडरे पाटील यांच्यासह मानकरी व महिला भाविक उपस्थित होते.

नागदेवतेची पूजा मानकरी पुष्पा चिताळकर पाटील, माजी नगरसेविका ॲड. ज्योती राहुल चिताळकर पाटील, अनिता चिताळकर पाटील, निर्मला चिताळकर पाटील, सृष्टी घुडरे पाटील, राजश्री दिनेश कुऱ्हाडे पाटील, रेखा योगीराज कुऱ्हाडे पाटील, लक्ष्मी कुऱ्हाडे पाटील आणि सुवर्णा योगेश आरू यांच्या हस्ते करण्यात आली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने नागदेवतेची सनई-चौघड्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी नागदेवतेची पूजा करण्यात आली. नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेला पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. मंदिर परिसरात महिला भाविकांनी फुगड्यांचा खेळ खेळत पारंपरिक पद्धतीने नागपंचमीचा आनंद साजरा केला.

मिरवणूक श्री राम मंदिरातून पुन्हा माऊली मंदिरात दाखल झाल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर देवस्थानच्या वतीने मानकरी महिलांना नारळ प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. हरिनामाच्या गजरात या पारंपरिक मिरवणुकीची सांगता झाली.

आळंदी पंचक्रोशीतील विविध गावांमध्येही नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. नागनरसोबा विधीवत पूजेसह महिलांनी नागदेवतेची पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

नागपंचमीच्या दिवशी माऊली मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी लक्षात घेता व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, सुरक्षा रक्षक, सेवक आणि पुजारी यांनी भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन मिळावे यासाठी नियोजन केले. त्यामुळे दर्शन व्यवस्था सुरळीत राहिली.

दरम्यान, श्रावणातील पहिल्या सोमवारीही आळंदीतील पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. श्रावण महिना, नागपंचमी आणि पहिला सोमवार यामुळे आळंदी नगरीत दिवसभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

या संपूर्ण धार्मिक सोहळ्यात भीमा वाघमारे यांच्यासह महिला भाविक, मानकरी कुटुंबातील सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आळंदीतील प्रथा-परंपरांचे जतन करीत साजरी झालेली नागपंचमी भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम ठरली

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930