स्वराज ग्रुपतर्फे भव्य रक्तदान शिबिर; २९१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
आळंदी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त स्वराज ग्रुपच्या वतीने आळंदी देवाची येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेत १५ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक व माजी तालुका प्रमुख उत्तमदादा गोगावले, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, विद्यमान नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाताताई तापकीर, गटनेते सचिन गिलबिले, नगरसेवक सागर कुऱ्हाडे, गोविंद कुऱ्हाडे, दिनेश घुले, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, सुधीरभाऊ मुंगसे, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका विनयाताई तापकीर, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, पांडुरंग वहिले, अविनाश तापकीर, प्रदीप बवले, संदेश तापकीर, शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल चव्हाण, आनंदराव मुंगसे, रमेश गोगावले, अशोक कुऱ्हाडे, सागर भोसले, किरण येळवंडे, शशिराजे जाधव, शिरीष कारेकर, रुपालीताई पानसरे, सौरभ गव्हाणे, रोहन कुऱ्हाडे, उमेश कुऱ्हाडे, चेतन नाना कुऱ्हाडे, रविंद्र रंधवे, चारुदत्त प्रसादे तसेच पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वराज ग्रुपचे अध्यक्ष आशिषदादा गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अमित डफळ, मोहसिन शेख, तुषार प्रसादे, सागर कारेकर, अभिमन्यू मुंगसे, अभिजीत डफळ, ज्ञानेश्वर वाघमारे, मंगेश आरु, राज पवळे, अभिजित फदाले, सौरभ साळुंखे, सुशील कारेकर, चारुदत्त रंधवे, अनिकेत डफळ, शुभम देशमुख, श्रीपाद सुर्वे, उमेश मुंढे, अजिंक्य मुंगसे, सुरज बोराटे, मनोज पवार, अनिरुद्ध पाटील, निखिल मोजाड, समीर सलाते, सागर मेनकुदळे, निलेश वाबळे, संग्राम चव्हाण, स्वप्निल कोळी, निस्सार सय्यद यांच्यासह स्वराज ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
स्वराज ग्रुपच्या वतीने सलग १९ वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढत असून यंदाही २९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडविले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत मिळावी आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या शिबिरासाठी जालिंदर महाराज भोसले तसेच रेड प्लस ब्लड बँकेचे पोपटराव शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी अर्जुन मेदनकर, शशिकांत बाबर, गोविंद ठाकूर तौर, नितीन ननवरे, महादेव पाखरे यांनी शिबिराला भेट देऊन आयोजक व रक्तदात्यांचे कौतुक केले आणि आपल्या मनोगतातून सदिच्छा व्यक्त केल्या.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा स्वराज ग्रुपच्या वतीने विशेष भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला. सलग १९ वर्षे रक्तदान शिबिराची परंपरा कायम ठेवत शेकडो रक्तदात्यांना या सामाजिक कार्याशी जोडल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी स्वराज ग्रुपच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





