नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ऊस चोरी करणाऱ्यांना लोणीकंद पोलिसांनी केली अटक – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

ऊस चोरी करणाऱ्यांना लोणीकंद पोलिसांनी केली अटक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

आष्टापुर (ता हवेली ) येथील शेतातून ऊस चोरी करणाऱ्या चोरट्यांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शेतमालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिल नंदकुमार कामठे यांच्या कुटुंबाची आष्टापुर येथील गट क्रमांक ८२२ मध्ये शेती आहे, १९ ते २३ ऑगस्टदरम्यान कामठे कुटुंबीय मुंढवा येथे गेले असताना अज्ञात व्यक्तींनी शेतातील सात महिन्यांचा तब्बल ८८ हजार रुपये किमतीचा अंदाजे ४० टन ऊस चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत २४ ऑगस्ट रोजी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

तपासादरम्यान नवनाथ लक्ष्मण कोतवाल (वय २९, रा. आष्टापुर) याच्या सांगण्यावरून योगेश पोपट गव्हाणे (वय २५, आष्टापुर) याने आपल्या कामगारांच्या मदतीने ऊस तोडून चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर; संजय दराडे, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर; मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त (सो), पुणे शहर; अबिनाश कुमार, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-७, पुणे शहर; तसेच अनिता मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कागणे, पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, सागर जगताप, मल्हारी सुपरे, सुधीर शिवले, दिनेश मरकड, सागर वाळके, अजिंक्य ढमढेरे, सचिन चव्हाण व सुनील काळे, यांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सागर जगताप हे करत आहेत.

 

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930