नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मावळातील अनधिकृत डान्सबार बंद करा; संभाजी ब्रिगेडचा इशारा – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

मावळातील अनधिकृत डान्सबार बंद करा; संभाजी ब्रिगेडचा इशारा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेले कथित अनधिकृत डान्सबार तातडीने बंद करून त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन दिले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा सचिव निलेश ढगे, मीनीनाथ गजरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, काही ठिकाणी लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत डान्सचे कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असून अनेक कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक परिणाम होत असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. संबंधित आस्थापनांची अधिकृत परवानगी व नियमांचे पालन याबाबत प्रशासनाने तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

“मावळ तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीचा भाग आहे. या भूमीत अशा प्रकारचे गैरप्रकार सुरू असतील तर त्याचा संभाजी ब्रिगेड तीव्र निषेध करते,” असे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी सांगितले.

वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अनधिकृत डान्सबारची तातडीने चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मावळ तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंद्रशेखर घाडगे यांनी दिला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930