आदर्श सरपंच पुरस्काराने सुप्रिया कंद यांचा सन्मान
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, कर्तव्यनिष्ठ नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्याची दखल घेत सुप्रिया जयअप्पा कंद यांना दैनिक प्रभात या माध्यमाने दखल घेऊन ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गावाच्या विकासाला नवी दिशा देत विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय कंद, ग्रामपंचायत सदस्य गौरव झुरुंगे यांच्यासह ग्रामस्थांनी सरपंच सुप्रिया कंद यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुप्रिया कंद यांच्या नेतृत्वातून गावाच्या विकासाची यशस्वी परंपरा अशीच पुढे चालत राहावी आणि भविष्यातही त्यांच्या हातून जनहिताची अनेक उल्लेखनीय कामे घडावीत, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





