मुक्ताईकडून ज्ञानदेवांना राखी अर्पण
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
आळंदी (गौतम पाटोळे) : रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांना पारंपरिक पद्धतीने राखी अर्पण करण्यात आली. मुक्ताईकडून बंधू श्री ज्ञानदेवांना राखी अर्पण करण्याची ही परंपरा यंदाही भक्तिभावाने पार पडली.

यावेळी मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, ह.भ.प. रवींद्र महाराज हारणे, संदीप पाटील तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त रोहिणी पवार, सागर महाराज लाहुडकर, संदीप भुसे, पांडुरंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने पार पडलेल्या या पारंपरिक सोहळ्यामुळे आळंदीतील भक्तिमय वातावरणात भाविकांना संत ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई यांच्या बंधुभावाच्या नात्याचे दर्शन घडले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





