पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न; १० सप्टेंबरला संभाजी ब्रिगेडचे घंटानाद आंदोलन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पुणे : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. येत्या आठ दिवसांत प्रशासनाने वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस कार्यवाही न केल्यास १० सप्टेंबर रोजी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रशासनाकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने देण्यात आली असून आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप वाहतूककोंडीच्या प्रश्नावर अपेक्षित तोडगा निघालेला नसल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाढती वाहनसंख्या, वाहतूक व्यवस्थेतील अडचणी आणि विविध ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासन आणि वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वाहतूककोंडी कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अनेक वेळा निवेदने देऊन आणि आंदोलने करूनही प्रश्न सुटलेला नाही. प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नाही तर १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घंटानाद आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल,” असे चंद्रशेखर घाडगे यांनी सांगितले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





