नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , कवी विनोद अष्टुळ महाराष्ट्र आयकॉन २०२६ पुरस्काराने सन्मानित – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

कवी विनोद अष्टुळ महाराष्ट्र आयकॉन २०२६ पुरस्काराने सन्मानित

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुणे : मराठी भाषा संवर्धन, साहित्य, कला, सांस्कृतिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे चतुरस्त्र पुण्यातील कवी विनोद अष्टुळ यांना सोलापूर येथे ‘महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले.

सुप्रसिद्ध साप्ताहिक ‘आपली चळवळ’ आणि ‘जनसंवाद न्यूज’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार सोहळा सोलापूर येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम, मोहोळ पंचायत समिती सभापती असलम चौधरी, जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरुटे, अरुणा शिवशरण, ‘आपली चळवळ’चे संपादक गोरक्ष गायकवाड, ‘जनसंवाद न्यूज’चे संपादक कैलास रणदिवे, कार्यकारी संपादक पितांबर धिवार आदी मान्यवर उपस्थित होते.

विनोद अष्टुळ गेल्या १४ वर्षांपासून मराठी भाषा आणि साहित्य संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असून त्यांनी तब्बल २२८ कवी संमेलने आयोजित केली आहेत. ‘साहित्य सम्राट पुणे’ संस्थेच्या माध्यमातून उद्याने, मंदिरे, ग्रंथालये, दवाखाने, सुवर्णपेढ्या, अनाथ आश्रम, विविध सभागृहे, पदपथ, गुहा तसेच स्मशानभूमीतही कवी संमेलने घेऊन साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव प्रयत्न त्यांनी केला आहे.

शाळा, महाविद्यालये आणि विविध उत्सवांमध्ये ‘शब्द बोले काळजाला’ हा विशेष उपक्रमही ते राबवत आहेत. सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य व्यासपीठ निर्माण करून अनेक नवोदित कवी, लेखक आणि साहित्यिकांना त्यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे.

अष्टुळ हे महाराष्ट्र राज्याचे विशेष कार्यकारी अधिकारी असून भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक आहेत. तसेच सहकार, कामगार, आध्यात्मिक, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध संस्थांच्या माध्यमातून ते सातत्याने प्रामाणिक व निस्वार्थीपणे कार्यरत आहेत.

त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी अण्णाभाऊ साठे, छत्रपती संभाजी महाराज, अटल बिहारी वाजपेयी, कुसुमाग्रज, आद्यकवी कालिदास, कवी संजीव, महाराष्ट्र भूषण, मोहम्मद रफी, टॉप टेन कवी, चतुरस्त्र कवी तसेच पुणे महानगरपालिकेचा गुणवंत गौरव यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत ‘आपली चळवळ’ आणि ‘जनसंवाद न्यूज’ समूहाने विनोद अष्टुळ यांना मान्यवरांच्या हस्ते ‘महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार २०२६’ प्रदान केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी खरी पत्रकारिता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे काम ‘आपली चळवळ’ आणि ‘जनसंवाद न्यूज’ समूह करत असल्याचे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमास शिक्षण, साहित्य, सहकार, कला, कामगार आदी क्षेत्रांतील मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विनोद अष्टुळ यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले. प्रास्ताविक अजय उदाटे यांनी, तर आभार राजेंद्र माने यांनी मानले.

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930