नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शिक्षक दिनानिमित्त २६ शिक्षक व ६ कर्मचाऱ्यांचा सन्मान – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

शिक्षक दिनानिमित्त २६ शिक्षक व ६ कर्मचाऱ्यांचा सन्मान

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

फुलगाव (गौतम पाटोळे) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय, फुलगाव (ता. हवेली) येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यालयातील २६ शिक्षक व ६ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

संत तुकाराम स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व लोकनायक जयप्रकाश नारायण ज्येष्ठ नागरिक संघ, लोणीकंद यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तमअण्णा भोंडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

यावेळी प्रकाश गिरीगोसावी, बाळासाहेब ढगे, रघुनाथ कंद, कुलाल वकील तसेच फुलगाव श्री शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव खुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचे शिल्पकार असून, विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच संस्कार, मूल्ये आणि जीवनदृष्टी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते सातत्याने करीत असतात. शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश केकाण यांनी उपस्थित मान्यवर, आयोजक, शिक्षक व कर्मचारी यांचे आभार मानले.कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930