वाजेवाडी-मांजरेवाडीत भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अमित सोनवणे यांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वाजेवाडी : भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस अमित तानाजी सोनवणे यांनी रविवारी (दि.१४ जून) वाजेवाडी-मांजरेवाडी येथे नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले. या उपक्रमाला गावातील नागरिक, महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता दरबारात अमित सोनवणे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या तसेच गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध सूचनांची माहिती घेतली. यावेळी खराब रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सार्वजनिक सुविधांची गरज आणि शेतीविषयक अडचणी यांसह अनेक विषय नागरिकांनी मांडले.
सध्या पावसाअभावी शेतीची कामे रखडल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. वेळेवर पाऊस न झाल्यामुळे पेरणीची कामे थांबली असून आगामी हंगामाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
यावेळी बोलताना अमित सोनवणे म्हणाले, “लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य तो मार्ग काढणे, संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा करणे आणि जनतेला न्याय मिळवून देणे हेच माझे कर्तव्य आहे. नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे समाजसेवेची जबाबदारी अधिक वाढते. गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे.
जनता दरबारात नागरिकांनी विविध समस्या मांडत विकासकामांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. अनेक प्रश्नांवर तातडीने संबंधित विभागांशी संपर्क साधून कार्यवाही करण्याचे आश्वासन सोनवणे यांनी दिले. या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडण्याचे व्यासपीठ मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि शेतकरी यांनी या जनता दरबारात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नाचे ग्रामस्थांनी स्वागत केले..
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





