प्रदीपभाऊ कंद यांच्या आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा भक्तिभावात पूर्ण
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स, प्रतिनिधी:
अयोध्या–काशी यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आज हजारो यात्रेकरूंनी भक्तिभाव, आध्यात्मिक उर्जा आणि आनंदाने ओतप्रोत असा दिव्य अनुभव घेत प्रभू श्रीरामाचे श्रीराम जन्मभूमीवरील दर्शन लाभले. “जय श्रीराम” आणि “हर हर महादेव”च्या घणाघाती जयघोषांनी वातावरणात भक्तिरसाचा सागर उसळला होता. प्रभू श्रीराम व भगवान महादेवांच्या सान्निध्यात यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज, समाधान आणि आनंद झळकत होता.श्रद्धा, सामर्थ्य आणि अध्यात्मिक एकतेचा संगम घडवत ही पवित्र यात्रा पुढे सरकत राहिली. यात्रेकरूंनी प्रभू श्रीराम आणि महादेवांच्या चरणी मनोकामना व्यक्त करत सर्वांच्या मंगलमय, समाधानकारक आणि समृद्ध जीवनासाठी प्रार्थना केली.
लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप वसंतराव कंद यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. हजारो भाविकांना काशी–अयोध्येचे देवदर्शन घडवल्याने ग्रामस्थांमध्ये प्रदीप भाऊंच्या कार्याविषयी आत्मीयता व कृतज्ञता अधिक दृढ होत आहे. गावोगावचे भाविक गंगेच्या प्रवाहात दिवा अर्पण करून प्रदीपभाऊंच्या विजयासाठी, मंगलमय वाटचालीसाठी काशी विश्वेश्वर व प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी साकडे घालत आहेत.ग्रामस्थांचा विश्वास व प्रेम व्यक्त करत “प्रदीपभाऊ प्रत्येक कुटुंबाशी घट्ट जोडले गेले आहेत” अशी भावना नागरिकांनी मोकळेपणाने प्रकट केली.
या यात्रेदरम्यान भाविकांना काशी विश्वेश्वर दर्शन, श्रीराम जन्मभूमी मंदिर, हनुमानगढी, सरयू स्नान, तसेच गंगा आरतीचा दिव्य अनुभव लाभला. संपूर्ण यात्रेत सुव्यवस्थित नियोजन, सुरक्षितता आणि उत्कृष्ट व्यवस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली.आशीर्वाद, भक्तिभाव आणि समाधानाची अमूल्य अनुभूती देत प्रदीपभाऊ कंद यांच्या आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





