फुलगाव येथे मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद प्रतिनिधी
फुलगाव (ता. हवेली) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत श्रीसत्यसाई सेवा संघटना पुणे, महाराष्ट्र पश्चिम यांच्या वतीने भगवान श्रीसत्यसाई बाबांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त शनिवार (दि.१३) डिसेंबर २०२५ रोजी १०१ मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती, फुलगाव समिती प्रमुख सुनिल वागस्कर यांनी दिली.
श्रीसत्यसाई संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र राज्याध्यक्ष धर्मेश वैद्य, जिल्हाप्रमुख गिरीश लेले, संयोजक बाळासाहेब वाल्हेकर, व्यंकटेश जालगी, सुनिल वागस्कर, शंकर वागस्कर, नितीश श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक विवाह सोहळ्याचे नियोजन सुरू आहे.
श्रीसत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने सामाजीक बांधीलकीतून भगवान श्रीसत्यसाई बाबांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त सर्व जातीय सामुदायीक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून विवाह सोहळ्यात लग्न लावणाऱ्या नागरीकांचा वेळ, श्रम व आर्थीक बचत होईल. भगवान श्रीसत्यसाई बाबांच्या पवित्र आशीर्वादाने १०१ प्रेमळ जोडप्यांचा विवाह सोहळा साजरा करण्याचा श्रीसत्यसाई सेवा संघटनेचा मानस आहे.
श्रीसत्यसाई संघटनेचे सर्व पदाधिकारी सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.सामुदायीक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधुसाठी सोन्याचे मनी मंगळसुत्र,चांदीची जोडवी शालु व चप्पल, वरासाठी सफारी सुट,संसारासाठी लागणारी भांडी,हार, बाशिंग व होमाचे साहित्य मोफत दिले जाईल. सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी फुलगाव समिती, प्रमुख सुनिल वागस्कर, व शंकर वागस्कर (९८२३८५५८८१) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन श्रीसत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





