आळंदीत संविधान दिनी संविधान उद्देशिकेचे लोकार्पण
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स, प्रतिनिधी
आळंदी पंचक्रोशीतील संविधान प्रेमी नागरिक, विविध सेवाभावी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संविधान उद्देशिकेचे कोनशिला पूजन, लोकार्पण आणि वारकरी–भाविक–नागरिकांना उद्देशिकेचे वाटप करून भारतीय संविधानातील मूल्ये समाजापर्यंत पोहोचविण्यात आली.

आळंदी जनहित फाउंडेशन, भारतीय बौद्ध महासभा, स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, संदेश नवले सोशल फाउंडेशन, तसेच आळंदी ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन, मान्यवरांची मनोगते, अभिवादन आणि प्रबोधनाचे विविध कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रमात संत साहित्य अभ्यासक विश्वकर्मा महाराज पांचाळ, जेष्ठ कीर्तनकार तुकाराम महाराज ताजणे, मुख्य संयोजक व आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सचिव रामदास दाभाडे, कैवल्य टोपे, विश्वभर शिंदे तसेच पत्रकार गौतम पाटोळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक, वारकरी उपस्थित होते.
मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तुकाराम महाराज ताजणे आणि विश्वकर्मा महाराज पांचाळ यांच्या हस्ते उद्देशिका कोनशिलेचे लोकार्पण करण्यात आले. इंद्रायणी नदी घाटावर भाविक, वारकरी आणि नागरिकांना संविधान उद्देशिकेचे वाटप करून संविधान मूल्यांची जनजागृती करण्यात आली.
बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा गौरव करीत त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि संविधान निर्मितीतील बहुमूल्य योगदान यावर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.संविधान दिनानिमित्त तक्षशिला बुद्ध विहार येथे दीपप्रज्वलन, बुद्ध वंदना, त्रिशरण–पंचशील पठण आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.आयु. नामदेव सुरपल्लीकर व आनंद रणदिवे यांनी संविधान मूल्यांवर आधारित मार्गदर्शन केले. डॉ. आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी विश्वनाथ थोरात, विनायक गायकवाड, सुभाष भोसले, बाळासाहेब भोसले, प्रविण रंधवे, भिमराव थोरात, प्रशांत रंधवे, संजय रंधवे, श्रेयस रणदिवे, महेंद्र रंधवे, रोहित थोरात, दिलीप वहिले, विलास रणपिसे, चारुदत्त रंधवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष संदेश नवले, संदेश नवले सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक नवले आणि विश्वंभर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन अर्जुन मेदनकर यांनी केले.
आळंदी परिसरात संविधान उद्देशिकेचे वाटप करून संविधान दिनी संविधानाचा जागर करणारा हा उपक्रम विशेष प्रशंसनीय ठरला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





