योगेश झुरुंगे यांच्या पुढाकारातून घडले नागरिकांना विविध तीर्थक्षेत्रांची दर्शन..
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स, प्रतिनिधी
लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेसाठी माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या पुढाकाराने नरसोबाची वाडी, अदमापूर, कोल्हापूर आणि ज्योतिबा मंदिर देवदर्शन यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. या यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेकडो भाविकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

मंगळवार, दि. २५ रोजी लोणीकंद येथून दोन बसमार्गे भाविकांचा ताफा रवाना झाला. दोन दिवसांच्या या यात्रेदरम्यान चहा–नाश्ता, जेवण, निवास यांसारख्या सर्व सुविधा उत्तम आणि शिस्तबद्ध पद्धतीने उपलब्ध करून दिल्या. यात्रेकरूंनी कोल्हापूरच्या आई अंबाबाई, ज्योतिबा, आदमापूर येथील बाळूमामा तसेच नरसिंहवाडीतील श्री दत्त मंदिर अशा पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. नरसिंहवाडीचे दत्त मंदिर कृष्णा–पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले असून श्री दत्तप्रभूंचे अवतार ‘श्री नृसिंह सरस्वती’ यांनी येथे बारा वर्षे तपश्चर्या केली होती, यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. या सेवाभावी यात्रेच्या उत्कृष्ट नियोजनाचे भाविकांनी मनापासून कौतुक केले.
धार्मिक, सामाजिक व जनकल्याणासाठी उपयुक्त उपक्रम सातत्याने राबविल्याबद्दल इच्छुक उमेदवार योगेश झुरुंगे यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक भावना वाढीस लागल्या आहेत.माजी उपसरपंच योगेश झुरुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे उत्कृष्ट नियोजन सागर झुरुंगे, दीपक झुरुंगे, राजेश झुरुंगे, स्वप्निल झुरुंगे, भारत झुरुंगे यांनी केले.

|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





