पुण्यातील रस्ते सुरक्षित व खड्डेमुक्त करण्यासाठी पीएमआरडीएचे महत्त्वपूर्ण निर्णय
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी
पुणे : हिंजवडी–वाघोली–शिक्रापूर पट्ट्यातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पीएमआरडीएने निर्णायक पावले उचलली आहेत. दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी आकुर्डी येथे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत रस्ते सुधारणा व वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात अनेक ठोस उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.
🔶 घेतलेले प्रमुख निर्णय
५ डिसेंबरपूर्वी सर्व मुख्य रस्ते खड्डेविरहित करण्याचे आदेश
हिंजवडी फेज १-३ एलिव्हेटेड कॉरिडोरसाठी भूसंपादन प्रक्रियेचा वेग वाढविणे
मेट्रो लाईन ३ अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती
हिंजवडी परिसरात स्थायी ट्रॅफिक सिग्नल्स बसविणे
धूळ प्रदूषण, बेकायदा डंपर / RMC प्लांट यांच्यावर कठोर कारवाई
पुणे–मुंबई बाह्यवळण मार्गावर आवश्यक ठिकाणी अंडरपास व सेवा रस्त्यांची उभारणी
भूगाव बायपास प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण करून कामाची जलद सुरुवात
वाघोली–शिक्रापूर परिसरासाठी नवीन बायपास मार्ग तयार करणे
🔶 विशेष निर्देश
सर्व प्रस्तावित रस्तेदुरुस्ती व भूसंपादन कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश, जलनिस्सारण सुधारणा, अतिक्रमण हटविणे आणि अपघात-प्रवण रस्त्यांची पुनर्बांधणी, वाघोली–केसनंद–खराडी परिसरातील नव्या बायपाससाठी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश, शिक्रापूर परिसरातील कोंडी मिटवण्यासाठी नवीन कनेक्टिव्हिटी रस्ते तातडीने मंजूर
या निर्णयांमुळे पुणे महानगर क्षेत्रातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच वाहतूक कोंडी व अपघातांची संख्या घटेल, असा विश्वास पीएमआरडीएकडून व्यक्त करण्यात आला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





