‘माहिती सेवा पत्रकार संघ’ची स्थापना : पत्रकारांसाठी नवीन व्यासपीठ
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स, प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या न्याय, हक्क, सोयीसुविधा आणि व्यावसायिक बळकटीसाठी ‘माहिती सेवा पत्रकार संघ’ या नव्या संघटनेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या अडचणी, समस्या आणि मागण्यांवर संघटना ठोस भूमिका घेणार आहे.
संघटनेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत सर्वसंमतीने अत्यावश्यक अशा ‘सुसज्ज पत्रकार भवन’ उभारण्याचा ऐतिहासिक ठराव करण्यात आला. हे भवन पुणे शहराजवळ उभारले जाणार असून त्यामध्ये पत्रकारांसाठी निवास सुविधा, प्रशिक्षण व कार्यशाळा, संपादन–रिपोर्टिंग तांत्रिक साधने, वाचनालय, मिटिंग हॉल, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधा यांचा समावेश असेल. तरुण पत्रकारांचे कौशल्य वाढवणे, त्यांना एकत्रित व्यासपीठ मिळवून देणे आणि व्यावसायिक मार्गदर्शन उपलब्ध करणे हा प्रमुख उद्देश आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे म्हणाले,पत्रकारांना मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या हक्कांसाठी सामूहिक आवाज निर्माण व्हावा, या हेतूने संघटनेची स्थापना केली आहे.
या बैठकीत संघटनेचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, उपाध्यक्ष सचिन धुमाळ, सचिव प्रशांत भागवत, खजिनदार पोपट मांजरे, संचालक ज्ञानेश्वर पाटेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्यात सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘माहिती सेवा पत्रकार संघ’ ही संघटना जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एक मजबूत, सहाय्यकारी आणि व्यावसायिक कुटुंब ठरेल, असा विश्वास अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी व्यक्त केला आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





