बकोरी गावातील भैरवनाथ यात्रेसाठी प्रदीपभाऊ कंद यांची ऐतिहासिक देणगी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी
बकोरी (ता. हवेली) येथे आयोजित भैरवनाथ यात्रेसाठी सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप वसंतराव कंद यांनी यंदा तब्बल १ लाख ११ हजार रुपयाची उदार देणगी दिली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी म्हणजे २०२४ सालीही ५१ हजार रुपयाची देणगी देत त्यांनी बकोरी ग्रामस्थांप्रती असलेले आपुलकीचे नाते दृढ केले होते.
प्रदीपभाऊ कंद यांचे सहकार्य हे बकोरी गावासाठी कायम स्वरूपी असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक महत्वाची कामे मंजूर करून दिली आहेत. गावातील दिव्यांच्या समस्येकडे त्यांनी विशेष लक्ष देत, ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला, ज्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला.
भैरवनाथ यात्रेनिमित्त मिळालेल्या या मोठ्या देणगीतून आणि त्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यातून प्रदीपभाऊ कंद यांचे बकोरी गावाप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा स्पष्ट जाणवतो. ग्रामस्थांकडून भाऊंच्या कार्याचे, सहकार्याचे आणि गावासाठी असलेल्या कळकळीचे मन:पूर्वक स्वागत करण्यात येत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





