कुशालनाना सातवांच्या झंजावाती प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
सांगवी सांडस येथून शेकडो समर्थक आणि वाहनांच्या लवाजम्यासह दमदार सुरुवात
लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील केसनंद–वाडेबोल्हाई गणातील पंचायत समिती सदस्यपदासाठी संभाव्य उमेदवार आणि युवकांचे प्रेरणास्थान ठरलेले युवा कार्यकर्ते कुशाल गोरख सातव यांच्या झंजावाती प्रचार दौऱ्याला सांगवी सांडस गावातून उत्साहात सुरुवात झाली.
या प्रचार दौऱ्यात केसनंद, वाडेबोल्हाई, न्हावी सांडस, सांगवी सांडस तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. गावागावातून काढण्यात आलेल्या या प्रचार यात्रा दौऱ्यामुळे गणात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुशालनाना सातव यांनी आपल्या पहिल्या गावभेट दौऱ्यास सांगवी सांडस येथून शेकडो समर्थक आणि शेकडो वाहनांच्या लवाजम्यासह दमदार सुरुवात केली.
दौऱ्याच्या प्रारंभी सांगवी सांडस गावात ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि जल्लोषमय वातावरणात ग्रामस्थांनी कुशालनाना सातव यांचे जोरदार स्वागत केले. गावात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत नागरिकांनी त्यांना निवडणुकीपूर्वीच विजयी घोषित केल्याचा आनंद सोहळा साजरा केला.
ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भावना विशेष लक्षवेधी ठरल्या. कुशालनाना हाच आमचा पक्ष, हेच आमचे चिन्ह, तर काही ग्रामस्थ म्हणाले, कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, वक्तृत्व म्हणजे फक्त कुशालनाना सातव.गणातील विविध गावांतील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांच्याकडून मिळत असलेल्या या जाहीर पाठिंब्यामुळे कुशालनाना सातव यांच्या उमेदवारीला अधिक भक्कम बळ मिळाले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





