पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटात खळबळ ‘या’ कुटुंबातील उमेदवार देखील मैदानात…
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स, प्रतिनिधी
पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटात ऐन थंडीमध्ये राजकीय वातावरण गरम व्हायला सुरुवात झाली आहे , सामाजिक कार्यकर्ते उत्तम विठ्ठलराव भोंडवे यांचे नातू आणि पैलवान संदीप भोंडवे यांचे पुत्र, पैलवान दिग्विजय संदीप भोंडवे हे निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून उतरल्याची माहिती पैलवान संदीप भोंडवे यांनी लोणीकंद टाईम्सला दिली.
आजोबा, सामाजिक कार्यकर्ते, समाज प्रबोधन केंद्राचे संस्थापक, अध्यक्ष उत्तम विठ्ठलराव भोंडवे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप उत्तम भोंडवे वडिलांच्या लोकसंग्रहाचा वारसा पुढे नेत, जनतेसोबत विकासाची नाळ अधिक दृढ करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे इच्छुक उमेदवार पैलवान दिग्विजय भोंडवे यांनी सांगितले.तर गटातील कार्यकर्त्यांचा आग्रह, जनतेच्या वाढत्या अपेक्षा आणि विकासाची नाळ अधिक बळकट करण्याच्या निर्धारातून भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणक लढविण्यासाठी पैलवान दिग्विजय संदीप भोंडवे यास मैदानात उतरवल्याची माहिती वडील पैलवान संदीप भोंडवे यांनी दिली.
त्यामुळे पुढील काळात लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात काय समीकरणे होतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत, तर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पीडीसी बँकेचे संचालक तथा भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





