विजय जाचक यांच्या उमेदवारी अर्जामुळे राजकीय समीकरणे ढवळून निघणार
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स, प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विमाननगर-लोहगाव प्रभाग क्रमांक ३ड मध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. सत्तास्पर्धेचे जोरदार वारे वाहू लागलेल्या या प्रभागात भाजप हवेली तालुका अध्यक्ष विजय अनिल जाचक यांनी नगरसेवक पदासाठी इच्छुक म्हणून अर्ज दाखल करताच वातावरण आणखी तापले आहे.
शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडे आपल्या उमेदवारीचा अर्ज सादर करताना जाचक यांच्या उपस्थितीने पक्षांतर्गतच मोठी चर्चा रंगली. गेल्या काही वर्षांत प्रभागातील रस्ते, पाणीटंचाई, ड्रेनेज समस्या तसेच दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विविध पायाभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत त्यांनी जनतेच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे.
बुथनिहाय संघटन मजबूत करणे, वरिष्ठ नेत्यांशी समन्वय राखणे आणि प्रभावी जनसंपर्क मोहिमेमुळे जाचक यांची पकड प्रभागात आणखी दृढ झाली आहे. दीर्घ राजकीय अनुभव, पक्षनेतृत्वाशी थेट संवाद, तसेच कार्यकर्त्यांमधील मजबूत विश्वास या तिन्ही गोष्टींमुळे त्यांच्या उमेदवारीला मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय ठरत आहे.
यामुळेच इतर इच्छुकांचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रभाग ३ड मधील निवडणूक अधिक चुरशीची, रंगतदार आणि अनिश्चिततेने भरलेली होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

विजय अनिल जाचक (इच्छुक उमेदवार, पुणे महानगरपालिका प्रभाग ३ड)

|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





