पुणे: मावळ तालुक्यात उत्खनन गैरव्यवहार उघडकीस; चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाइम्स / प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उत्खनन गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी चार तहसीलदारांसह एकूण दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांच्या सखोल चौकशीत परवानगीपेक्षा तब्बल ९० हजार ब्रास जादा उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत महसूल मंत्री यांनी दोषींवर कठोर कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा व गैरव्यवहारास मूक संमती दिल्याच्या आरोपाखाली ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
चौकशीत असे आढळून आले की, मंजूर परवानग्यांच्या मर्यादा ओलांडून मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू होते. महसूल यंत्रणेतील संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तपासणी न करणे, अहवालात त्रुटी ठेवणे व नियंत्रणात अपयश आल्याने शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
निलंबित अधिकाऱ्यांची नावे:
तलाठी (२):
दीपाली सनगर
गजानन सोटपल्लीवार
मंडळ अधिकारी (४):
संदीप बोरकर
माणिक साबळे
अजय सोनवणे
रमेश कदम
तहसीलदार (४):
जोगेंद्र कटियार
मनजीत देसाई
मधुसूदन बारगे
विक्रम देशमुख
(सदर कालावधीत कार्यरत असलेले तहसीलदार)
या प्रकरणामुळे महसूल विभागातील नियंत्रण व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील चौकशीत आणखी कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासनाने अशा गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





