कोरेगाव भीमा येथे भीषण अपघात; एक महिला ठार, एक गंभीर जखमी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स, प्रतिनिधी
पुणे–अहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव भीमा परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. सळईने भरलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
निलम रामचंद्र दाभाडे (रा. मांजरी) असे मृत महिलेचे नाव आहे. संबंधित कार पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. धडकेनंतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गंभीर जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस व आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





