नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली विजयस्तंभ परिसराची पाहणी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली विजयस्तंभ परिसराची पाहणी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पुर्व तयारीची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विजयस्तंभ परिसरास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, समाज कल्याणच्या आयुक्त दीपा मुंडे, बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत वाघमारे, पुणे शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, समाज कल्याण उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त तथा बार्टीचे निबंधक विशाल लोंढे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी वाहनतळ व इतर व्यवस्थेची पाहणी करुन तेथील तयारीचा आढावा घेतला. विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.यावेळी पोलीस विभाग आणि विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031