कोळपेवाडीतील बिरोबा भजनी मंडळास भजनाचे साहित्य भेट
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या गटात लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून मतदारांमध्ये त्यांना अनुकूल प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
सामाजिक कार्यातून सातत्याने केलेल्या कामांची जबाबदारी स्वीकारत आता जिल्हा परिषद सदस्य पदासाठी झुरुंगे यांनी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातील पेरणेतील कोळपेवाडी येथील बिरोबा भजनी मंडळास माजी उपसरपंच योगेश झुरुंगे यांच्या वतीने भजनासाठी आवश्यक साहित्य भेट देण्यात आले. कुसेगाव येथून आलेल्या भानोबा देवाच्या पालखीच्या अवचित साधून हे साहित्य सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पेरणेचे माजी उपसरपंच चांगदेव कोळपे यांनी दिली.
कुसेगाव ते कोयाळी मार्गावरील भानोबा देवाची पालखी कोळपेवाडी येथे विसाव्यासाठी थांबते. या वेळी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. याच प्रसंगी भजनी मंडळास साहित्य देण्यात आले. पालखीच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालखी सोबत आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात येते. या पालखीत असंख्य भाविक सहभागी होत असतात.
साहित्य भेट देताना पेरणे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळपे, पेरणेचे माजी उपसरपंच मच्छिंद्र गुंडकर, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे तज्ज्ञ संचालक सुदाम कोळपे, सोनबा ठोंबरे, माऊली तरुण मंडळाचे अध्यक्ष अविनाश कोळपे, भानूदास कोळपे, काळूराम ठोंबरे, किसन टुले, गणेश कोळपे, खंडू कोळपे, अक्षय कोळपे, चेतन ठोंबरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वखर्चातून बर्केगाव परिसरातील रस्त्यांचे मुरूमकरण, विविध समस्यांवर प्रभावी पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न अशा अनेक कामांमुळे झुरुंगे यांची वेगळी ओळख निर्माण झाली असून तरुण वर्गातही त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. विकासकामांसोबतच सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते कायम तत्पर राहिल्याचा अनुभव नागरिक व्यक्त करत आहेत.
पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास योगेश झुरुंगे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या गटात झुरुंगे यांची उमेदवारी निर्णायक होणार आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





