लोणीकंद–पेरणे परिसरात भव्य मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद प्रतिनिधी :
प्रदिपदादा कंद युवा मंच तसेच पै. किरण संपत साकोरे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेसाठी भव्य मोफत महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पेरणे टोलनाक्याजवळील गोल्डन पॅलेस येथे होणार आहे.
या आरोग्य शिबिरात नागरिकांसाठी ब्लड शुगर, ईसीजी, ब्लड ग्रुप, ब्लड प्रेशर, पल्सरेट, हिमोग्लोबीन, मुतखडा मार्गदर्शन तसेच सर्वसाधारण तपासणी करण्यात येणार असून हृदयविकार व ईसीजी संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला दिला जाणार आहे.
तसेच गुडघेदुखी, पाठीच्या मणक्याचे विकार व सर्व हाडांचे आजार, यांची तपासणी होणार आहे. यासोबतच मूळव्याध, भगंदर, फिशर, बद्धकोष्ठता, हर्निया, पित्त तपासणी तसेच आवश्यक असल्यास मोफत शस्त्रक्रिया व औषध वाटप करण्यात येणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत अँजिओप्लास्टी, हृदयातील छिद्र, वॉल्व्ह रिप्लेसमेंट, ओपन हार्ट सर्जरी, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी, हाडांचे फ्रॅक्चर आदी आजारांवरील मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शिबिरात मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत नंबरचे चष्मे वाटप करण्यात येणार आहे. याचबरोबर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून “रक्तदान हेच जीवनदान या संदेशाखाली प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
शिबिरास येण्यासाठी प्रत्येक गावातून ग्रामपंचायतीमार्फत बसची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी तपासणीस येताना जुने वैद्यकीय रिपोर्ट, आधार कार्ड झेरॉक्स, मतदान कार्ड झेरॉक्स व एक पासपोर्ट फोटो सोबत आणावा. तसेच आपल्या नियमित औषधांचे सेवन करून व हलका नाश्ता करून यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
• शहाजी शिंदे – ९८६००६५७२६
• नवनाथ वागस्कर – ९८२२६४१७८९
• गौरव झुरुंगे – ९९२२५०००१४
• विनोद गावंडे – ७७७५८६४५१६
या भव्य आरोग्य उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





