पिंपरी सांडस येथे श्री संत बाळूमामा सभा मंडपाचे लोकार्पण
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील कलकवाडी येथे शुक्रवार (दि. १९) रोजी कै. नवनाथ बंडू ढेकळे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या श्री संत बाळूमामा सभा मंडपाचा लोकार्पण समारंभ उत्साहात पार पडला. पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातील लोकप्रिय उमेदवार प्रदीप वसंत कंद यांच्या हस्ते या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले.
कै. नवनाथ ढेकळे यांची स्मृती कायम राहावी, या हेतूने सहकाऱ्यांनी सभामंडप उभारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयास प्रदीप कंद यांनी मोलाचा पाठिंबा देत भव्यदिव्य सभामंडपाचे काम पूर्ण करून दिले. या सामाजिक योगदानाबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी प्रदीप कंद यांचे आभार मानले.
यावेळी पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. आगामी निवडणुकीत प्रदीप कंद यांना मोठ्या बहुमताने यश मिळावे, यासाठी धनगर समाजाने श्री संत बाळूमामा यांच्या चरणी सांगड घालत जाहीर पाठिंबा दर्शविला. कार्यक्रमास प्रदीप कंद मित्रपरिवाराचीही लक्षणीय उपस्थिती होती..
मित्राच्या स्मरणार्थ प्रदीप कंद यांनी सभामंडपाचे काम पूर्ण करून दिले. आजकाल कोणी चार मुरुमाच्या गाड्या जरी आणून टाकल्या तरी त्याची पाचशे लोक जाहिरात करतात; मात्र प्रदीप कंद यांनी या सामाजिक कार्याची कुठेही जाहिरात केली नाही.दान असावे तर कर्णासारखे उजव्या हाताने केलेले दान डाव्या हातालाही कळू नये, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
प्रदीप कंद हे सामान्य कुटुंबातील मुलगा असून, तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य जनतेतूनच ते पुढे आले आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या प्रदीप कंद यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन सोमनाथ तांबे यांनी आपल्या मनोगतातून केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





