आरोग्य सेवेतून विश्वास जिंकणारा पै. किरण साकोरे
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
हजारो नागरिकांचा सहभाग; महाआरोग्य आरोग्य शिबिराला ऐतिहासिक प्रतिसाद
लोणीकंद, प्रतिनिधी
लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेसाठी मा. श्री. प्रदिपदादा कंद युवा मंच तसेच पै. किरण संपत साकोरे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तसेच भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबीर सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी पेरणे टोलनाक्याजवळील गोल्डन पॅलेस येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराच्या शुभारंभप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीपदादा कंद, पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र नारायण कंद, डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहुल गव्हाणे, सरपंच मोनिका कंद, सरपंच मंदानानी साकोरे, माजी सरपंच सुलोचना झुरुंगे, फुलगावचे माजी सरपंच सुनील वागास्कर, कांताराम वागस्कर, भानदास साकोरे, गजानन कंद, कल्याण शिंदे, राहुल वागस्कर, शंकर वागस्कर, संतोष झुरुंगे, राहुल शिंदे, गौरव झुरुंगे, सागर झुरुंगे, जय कंद, अतुल मगर, माऊली कंद यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
समाजाच्या आरोग्यासाठी समर्पित भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लोणीकंद–पेरणे गटात सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.आपल्या आरोग्याची काळजी घेणारा आपला माणूस” अशी ओळख निर्माण करणारे पै. किरण संपत साकोरे यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवत मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला. जिल्हा परिषद गटातील नागरिकांची मोठी उपस्थिती पाहता या शिबिराला सामाजिकदृष्ट्या ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले.
या महाआरोग्य शिबिरात नागरिकांसाठी ब्लड शुगर, ईसीजी, ब्लड ग्रुप, ब्लड प्रेशर, पल्सरेट, हिमोग्लोबीन तपासणी, तसेच मुतखडा मार्गदर्शन व सर्वसाधारण तपासणी करण्यात आली. हृदयविकार व ईसीजी संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या मोफत सल्ल्यामुळे अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.तसेच गुडघेदुखी, पाठीच्या मणक्याचे विकार व इतर हाडांचे आजार यांची सखोल तपासणी करण्यात आली. याशिवाय मूळव्याध, भगंदर, फिशर, बद्धकोष्ठता, हर्निया, पित्त आदी आजारांवरील तपासणी करून आवश्यक असल्यास मोफत शस्त्रक्रिया व औषध वाटप करण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत अँजिओप्लास्टी, हृदयातील छिद्र, वॉल्व्ह रिप्लेसमेंट, ओपन हार्ट सर्जरी, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी, हाडांचे फ्रॅक्चर आदी गंभीर आजारांवरील मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या शिबिरात मोफत डोळ्यांची तपासणी करून मोफत नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरात सहभागी प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू म्हणून बॅग देण्यात आली. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांसाठी चहा व नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यावेळी बोलताना म्हणाले, आपल्या सगळ्यांना मी सांगतो की, मुळात आमचा कार्यकर्त्यांचा राजकीय पिंडच नाही. आम्हाला राजकारणापेक्षा लोकांची सेवा करायची आहे. सेवाभावी वृत्तीने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणे हीच आमची मूळ प्रवृत्ती आहे. सर्वांच्या आग्रहातून आमच्यासारखे कार्यकर्ते राजकारणात आले आहेत. या गटातील नवी पिढी घडवायची असेल तर शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत विषयांकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी म्हणजे काय आणि समाजाच्या हितासाठी काम कसे करायचे, हे पै. किरण संपत साकोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.

|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





