वढू बुद्रुकमध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली; चोरट्यांचा धुमाकूळ
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वढू बुद्रुक (ता. शिरूर) : वढू बुद्रुक गावात भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ वाढत असून, एकाच रात्री मिठाई, किराणा आणि हार्डवेअरची ही तीन दुकाने फोडून चोरट्यांनी रोकड व ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना ( दि. २८) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे.
गावातील मुख्य चौकात असलेले शुभम भंडारे यांचे स्वीट होम मिठाई दुकान, कोठावळे यांचे किराणा दुकान, अमोल पोटावडे यांचे हार्डवेअर दुकान, ही तिन्ही दुकाने अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केली.
मिठाई दुकानाचे शटर मधोमध उचकटून चोरट्यांनी सुमारे १० हजार रुपये रोख, चिल्लर रक्कम तसेच थंड पेय व लस्सीचे पॅकेट चोरून नेले.कोठावळे यांच्या किराणा दुकानातून चांदीचा गणपती आणि महालक्ष्मीची मूर्ती लंपास करण्यात आली.तर हार्डवेअर दुकानाच्या समोरील ग्रील तोडून शटर उचकटून गल्ल्यातील सुमारे २ हजार रुपयांची चिल्लर चोरून नेण्यात आल्याची माहिती दुकान मालकांनी दिली.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी याच मिठाई दुकानात चोरी झाली होती. आता पुन्हा त्याच चौकात चोरी झाल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, वारंवार होत असलेल्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





