शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थेची पाहणी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
दरवर्षी १ जानेवारी रोजी शौर्यदिनी लाखो बौद्ध अनुयायी पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने विजयस्तंभ व परिसरात सर्व अनुयायांच्या सुविधेसाठी आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, हिरकणी कक्ष, व इतर अनेक सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आज या ठिकाणी भेट देऊन सर्व सुविधांची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब गुजर, कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे, गटविकास अधिकारी शेखर शेलार व महेश डोके, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





