पेरणे फाटा येथील विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाइम्स | प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करून शौर्यदिनास मानवंदना दिली. या वेळी त्यांनी विजयस्तंभाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा गौरव करत सामाजिक समतेचा संदेश दिला.

याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासन, पोलिस व स्वयंसेवी संस्थांचे नियोजनाबद्दल कौतुक करत, दरवर्षी लाखो अनुयायी येथे अभिवादनासाठी येतात, त्यामुळे शांतता, स्वच्छता व सुरक्षिततेस प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





