२०८ व्या शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे अभूतपूर्व गर्दी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
लोणीकंद, प्रतिनिधी | दि. १ जानेवारी २०२६

२०८ व्या शौर्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

अभिवादनानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाच्या वतीने हे अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रशासनाने उत्तम नियोजन केले असून भाविकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या महानगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका उशिरा होतील. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये युतीबाबत उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असून जागावाटपाबाबत आज रात्री निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयस्तंभ परिसर फुलांच्या सजावटीने उजळून निघाला असून संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणात न्हाऊन निघाला आहे. शौर्य, समता आणि इतिहासाच्या स्मरणार्थ होणारा हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडत असल्याचे चित्र आहे. थंडी असूनही सकाळपासून मोठ्या प्रमाणात नागरिक व अनुयायी उपस्थित होते. दुपारनंतर गर्दी वाढल्याने पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, वैद्यकीय पथके आणि मदत केंद्रे कार्यरत होती. ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण परिसराचे हवाई निरीक्षण करण्यात होते.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी अत्याधुनिक ‘दृष्टी’ मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनद्वारे चौफेर बारकाईने लक्ष ठेवले होते. या वाहनामध्ये थेट नियंत्रण कक्षाशी जोडलेली ऑडिओ-व्हिडिओ कम्युनिकेशन सिस्टीम, ३६० अँगल सीसीटीव्ही कव्हरेज, संशयास्पद हालचाली ओळखणारे तंत्रज्ञान, एआय कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग, रिअल टाइम डेटा ट्रान्सफर, ड्रोन कॅमेरे आणि नाईट व्हिजन सुविधा असल्यामुळे पोलिसांना परिस्थितीवर सतत नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.
शासनाकडून नागरिकांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. हा लढा जातीप्रतीच्या अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधात होता.पक्षाच्या बाहेरील उमेदवारांना संधी देण्यात आलेली नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील जागावाटपाबाबत त्यांनी सांगितले की, काँग्रेसने आम्हाला जास्त जागा दिल्या. ज्या ठिकाणी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार होते त्या जागा त्यांच्याकडे ठेवण्यात आल्या, तर ज्या ठिकाणी आमच्याकडे मजबूत उमेदवार होते त्या जागा आम्ही घेतल्या :- बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी आज शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन केले. यावेळी त्यांनी शासनाच्या धोरणांवर टीका करताना कोरेगाव भीमा येथील शौर्य दिनाच्या कार्यक्रमावर दरवर्षी करोडोंचा खर्च होतो व तो वाया जातो, निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने गुंडांना तिकीट दिली जात आहेत ज्या पद्धतीने पैशाचा वाटप होतंय त्यामुळे देशातील लोकशाही पुर्णपणे बदललीय त्यामुळे फ्रेंच राज पद्धतीने निवडणुका व्हाव्यात असं मोठं विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केलं, तर युतीतील जागां वाटपाबाबत बोलतानाना युतीत जागांबाबत कोणाचाच समाधान होत नाही :- आनंदराज आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नातू

पेरणेफाटा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमादरम्यान शहर पोलिसांनी अत्याधुनिक ‘दृष्टी’ मोबाईल सर्विलन्स व्हॅन द्वारे चौफेर बारकाईने लक्ष ठेवले होते.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





