क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती वढू खुर्द प्राथमिक शाळेत उत्साहात साजरी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
(लोणीकंद, प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती वढू खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेतील लहान मुला-मुलींची प्रभावी भाषणे झाली तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
या प्रसंगी सर्वांनी मिळून स्त्रीशक्तीचा आदर व सन्मान करण्याचा संकल्प केला. लोणीकंद पोलीस स्टेशनचे जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांसाठी मोबाईलच्या अति वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर जनजागृतीपर व्याख्यान घेतले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकवर्ग, सरपंच महेंद्र खांदवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण ढवळे, मुख्याध्यापक साळवे सर, शिक्षणप्रेमी रामदास मामा भंडारे, ह.भ.प. सुभाष महाराज पवळे तसेच वढू खुर्द ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व उपस्थितांनी मिळून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





