पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक २९ मधून भाजपाचे शशिकांत कदम यांचा दणदणीत विजय
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक २९ मधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शशिकांत कदम यांनी भरीव बहुमताने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच कदम यांनी आघाडी घेतली होती आणि शेवटपर्यंत ती कायम राखत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.

या विजयामुळे प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्थानिक विकासकामे, नागरिकांशी थेट संवाद आणि संघटनात्मक ताकद या मुद्द्यांच्या जोरावर कदम यांनी मतदारांचा विश्वास संपादन केल्याचे दिसून येते.विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. फटाके फोडून व एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आला.दरम्यान, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छता यावर विशेष लक्ष देणार, अशी ग्वाही शशिकांत कदम यांनी दिली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





