नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , बाप्पू , आता निर्णयाची वेळ – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

बाप्पू , आता निर्णयाची वेळ

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

कार्यकर्त्यांची अशोक पवारांना थेट साद

लोणीकंद | प्रतिनिधी

बापू, आता गप्प बसण्याची वेळ संपली आहे. शिरूर–हवेलीतील जनतेसाठी ठोस, धाडसी आणि भविष्य ठरवणारा निर्णय घ्यायलाच हवा,” अशी भावनिक पण ठाम साद शिरूर–हवेली मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी माजी आमदार अशोक पवार यांना घातली आहे.

मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापलेले असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, संभ्रम आणि अपेक्षा यांचे मिश्रण स्पष्टपणे जाणवत आहे. “तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. पण तो निर्णय आता व्हायलाच हवा, अशी भावना कार्यकर्त्यांकडून उघडपणे व्यक्त केली जात आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. बदललेल्या समीकरणांमध्ये केवळ एकनिष्ठा पुरेशी ठरत नसल्याची चर्चा आता दबक्या आवाजात नाही, तर उघडपणे सुरू आहे. वैचारिक मतभेद मान्य, पण ढासळत चाललेल्या राजकीय वाटचालीला यु-टर्न देणे अपरिहार्य झाले आहे. त्यासाठी पक्षांतर हाच एकमेव पर्याय उरला आहे का? असा थेट सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

याशिवाय अशोक पवार यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे, त्यांच्या पराभवासाठी साम–दाम–दंड–भेदाचा वापर करणारे राजकीय घटकही चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.ज्या पक्षातीलच काही घटक पवारांच्या पराभवासाठी प्रयत्नशील आहेत, त्या पक्षाला मतदान करायचे का?हा प्रश्न आता सामान्य कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये सातत्याने विचारला जात आहे.

जनता मावळतीला नाही, तर उगवत्याला नमस्कार करते, या म्हणीचा दाखला देत कार्यकर्ते स्पष्टपणे सांगत आहेत की, आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा, काळाची गरज ओळखणारा निर्णय घ्यावा लागेल.

अशोक पवार कोणती भूमिका घेतात, कोणता मार्ग निवडतात, यावर शिरूर–हवेली मतदारसंघातील राजकीय समीकरणे आणि भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे केवळ कार्यकर्तेच नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031