वाडेबोल्हाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाची गजानन पाटील यांनी केली पाहणी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद, प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या “पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र” या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला आधुनिक आणि सक्षम स्वरूप प्राप्त होत आहे. या उपक्रमांतर्गत हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध विकासकामे व लोकोपयोगी सुविधांची उभारणी सध्या प्रगतीपथावर आहे.

गजानन पाटील यांनी आज वाडेबोल्हाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन सुरू असलेल्या कामांची सखोल पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, उपचार सेवा, औषध उपलब्धता तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत नागरिकांना अधिक दर्जेदार, वेळेवर व सुलभ आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी आधारस्तंभ असल्याने त्यांचे कामकाज अधिक प्रभावी आणि रुग्णाभिमुख असावे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या भेटीमुळे वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील विकासकामांना अधिक गती मिळणार असून, परिसरातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





